देई मला दर्शन, साई देई मला दर्शन देई मला दर्शन, साई देई मला दर्शन । भावभक्तीने तुझ्या भेटीला आलो मी शरण ॥धृ॥ भक्त जनांची तूच माऊली, तुझ्या कृपेने मिळे साऊली । संकटाच्या वाटेवरती तूच आश्रयस्थान ॥१॥ हांक ऐकता येशि धावूनी, रात्रंदिन भजतो म्हणूनी, तुझ्या दर्शना व्याकुळ झालो, करु नको अवमान ॥२॥
Continue Reading...Jan 032009